बांधकाम कामगारांना स्मार्ट कार्ड मिळणार घरपोच; कार्यालयात गर्दी न करण्याचे आवाहन


अकोला, दि.30(जिमाका) राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच कोरोनाच्या डेल्टा प्लस विषाणुने बाधीत रुग्ण आढळुन येत आहे. या विषाणुचा संक्रमणाचा दर जास्त असल्यामुळे विषाणुमधील बदल आणि त्यापासुन होणारा प्रादुर्भाव व फैलाव रोखण्याचे दृष्टीने जिल्ह्यामध्ये  कडक निर्बंध घोषीत केले आहे. माहे जुन 2021 मध्ये ब्रेक द चेन कालावधीज्या बांधकाम कामगारांचे नोंदणी अर्ज मंजुर झालेले आहेत व जिल्हा कार्यालयाकडुन ओळखपत्र (स्मार्टकार्ड) देणे बाबत लघुसंदेश (एसएमएस) प्राप्त झालेले आहेत असे बांधकाम कामगार मोठ्या प्रमाणात कामगार कार्यालयामध्ये येत आहेत. बांधकाम कामगारांचे संख्या मोठ्या संख्येने असल्याने कोविड प्रतिबंधात्मक नियमाचे व प्रशासनाव्दारे घोषीत निर्बंधाचे पालन होत नसल्याने बांधकाम कामगारांना कार्यालयात गर्दी न करण्याचे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त रा. दे. गुल्हाने. यांनी केले आहे.

महाराष्ट्र  इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई अंतर्गत ज्या बांधकाम कामगारांचे नोंदणी अर्ज यापुर्वीच मंजुर झालेले आहेत व बांधकाम कामगारांनी नोंदणी फी व वर्गणीची रक्कम मंडळाच्या बँक खात्यात जमा केलेले आहे, अशा बांधकाम कामगारांचे ओळखपत्र (स्मार्टकार्ड ) फिल्ड एजंट, खासदुत, कुरियर, पोस्ट ऑफिसमार्फत बांधकाम कामगारांच्या निवासी पत्यावर पाठविण्यात येत आहेत.

ज्या बांधकाम कामगारांचे नोंदणी अर्ज दि 9 जून 2021 पुर्वी मंजुर झालेले आहेत तथापि, बांधकाम कामगारांना नोंदणी फी व वर्गणीची रक्कम मंडळ खाती जमा केलेली नाही, अशा बांधकाम कामगारांना मे. आयटीआय लिमिटेड व मे आरसीएस इन्फो प्रा. लि. या संस्थेकडुन लघुसंदेश (एसएमएस) व्दारे पेमेंट लिंक पाठविण्यात आलेली आहे. लिंकव्दारे बांधकाम कामगाराने पेमेंट गेटवे मार्फत नोंदणी फी व वर्गणीची फी मंडळखाती जमा करताच नोंदणी क्रमांक व पुढील नुतनीकरणाचा दिनांक लघुसंदेश (एसएमएस) व्दारे कळविण्यात येत आहे. नोंदणी क्रमांकाच्या आधारे बांधकाम कामगारांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ ऑनलाईन पध्दतीने घेता येईल. बांधकाम कामगारांना यथावकाश ओळखपत्र वितरीत करण्यात येईल.

मंडळामार्फत दि.9 जून 2021 पासुन नोंदणी फी व वर्गणीची रक्कम ऑनलाईन पध्दतीने पेमेंट गेटवे मार्फत भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. बांधकाम कामगारांना नोंदणी अर्ज मंजुर झाल्यानंतर मंडळामार्फत पाठविण्यात येणाऱ्या लघुसंदेश (एसएमएस) व्दारे पेमेंट गेटवेची लिंक पाठविण्यात येत आहे. लिंकचा वापर करुन बांधकाम कामगारांना नोंदणी फी व वर्गणीची रक्क्म जमा झाल्यानंतर बांधकाम कामगारांना फी व वर्गणीची रक्कम जमा झाल्याची पावती व नोंदणी क्रमांकाच्या आधारे मंडळाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेता येईल. याकरीता तुर्तास ओळखपत्र (स्मार्टकार्ड) ची आवश्यकता राहणार नाही त्यामुळे दि. 9 जून नंतर नोंदणी अर्ज मंजुर झालेल्या बांधकाम कामगारांना यथावकाश कार्यालयामार्फत फिल्ड एजंट अथवा खास दुतामार्फत ओळख पत्र वाटप करण्यात येईल.

सर्व बांधकाम कामगारांनी नोंदणी, नुतनीकरण व लाभाबाबत ऑनलाईन प्रक्रीयेचा लाभ घ्यावा. तसेच   जिल्हा कार्यालयात कोरोना प्रतिबंधात्मक नियमाचे पालन करुन बांधकाम कामगारांनी कार्यालयात गर्दी न करण्याचे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त विभागाव्दारे करण्यात आले आहे.

0000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ