दुध व दुग्‍धजन्‍य पदार्थ सायंकाळी सातपर्यंत विक्रीस मुभा; जिल्हाधिकारी पापळकर यांचे आदेश


अकोला, दि.11(जिमाका)-  अकोला जिल्ह्यात कोविड रुग्‍णांचा पॉझीटीव्‍हीटी रेट व ऑक्सिजन बेडची उपलब्‍धता लक्षात घेऊन दि. 6 जून रोजी आदेश निर्गमित केले आहेत. सदर आदेश कायम ठेऊन अंशता बदल करुन सुधारित आदेश  जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज निर्गमित  केले आहेत.

सुधारित आदेशानुसार दुध व दुग्‍धजन्‍य पदार्थ विक्री, डेअरी, दुध संकलन केन्‍द्र, दुध वितरण व्‍यवस्‍था सोमवार ते रविवारी सकाळी सात ते चार व  सायंकाळी पाच ते सात यावेळेत सुरु राहिल. हे आदेश अकोला शहर तसेच जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागाकरिता दि. 12 जूनचे सकाळी सात वाजेपासून पुढील आदेशापर्यंत लागू राहतील. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ