जिल्ह्यातील निर्बंधांबाबत स्थिती 'जैसे थे'; जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत समिक्षा


अकोला,दि.११(जिमाका)- जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीच्या आजच्या बैठकीत कोविड-१९ संसर्ग व सद्यस्थिती बाबत आज आढावा घेण्यात आला. अद्यापही जिल्ह्याचा रुग्ण बाधिततेचा (पॉझिटिव्हीटी)दर ५.३७ असल्याने जिल्ह्यातील निर्बंध अधिक शिथिल न करता आहे ती परिस्थिती कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली आज ही बैठक पार पडली. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, मनपा आयुक्त निमा अरोरा, पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुरेश आसोले, प्रभारी उप संचालक तथा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजकुमार चव्हाण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या  अधिष्ठाता डॉ.मिनाक्षी गजभिये, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे आदी उपस्थित होते.

या बैठकीत दि.४ ते १० जून या दरम्यानच्या आठवड्यात अकोला जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी दर हा ५.३७ आहे, तसेच अद्यापही पॉझिटिव्हिटी दर 5 टक्के पेक्षा जास्त असल्यामुळे अधिक काळजी घेणे आवश्यक आहेत  त्यामुळे राज्य शासनाने निर्बंधांबाबत निर्धारित केलेल्या निकषांमध्ये अद्यापही अकोला जिल्हा हा तिसऱ्या पातळीवर असून अशा परिस्थितीत जिल्ह्यातील निर्बंधांबाबत जैसे थे स्थिती ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ