पालकमंत्र्यांकडून दिव्यांग युवतीस संगणक व सहसाहित्याची मदत

 



अकोला,दि. 14(जिमाका)- राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक  मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी कुटासा येथील गायत्री चंद्रशेखर निहारकर या दिव्यांग युवतीस स्वयंरोजगार करण्यासाठी संगणक व सहसाहित्य देऊन मदत केली.

यावेळी विधान परिषद सदस्य आ.गोपीकिशन बाजोरिया, आ.अमोल मिटकरी, विधानसभा सदस्य आ.नितीन देशमुख, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, मनपा आयुक्त निमा अरोरा,  अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे तसेच युवतीचे कुटुंबीय उपस्थित होते. या युवतीस शासनाचे आपले सेवा केंद्र मंजूर झाले असून त्यात ह्या साहित्याचा वापर करून लोकांना सेवा उपलब्ध करून त्याद्वारे स्वयंरोजगाराची सोय झाली आहे.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ