रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः 1015 चाचण्यात 36 पॉझिटीव्ह

 


अकोला,दि.8(जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.7) दिवसभरात झालेल्या 1015 चाचण्या झाल्या त्यात 36  जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

            काल दिवसभरात अकोट येथे 28 चाचण्या झाल्या त्यात सहा जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, बार्शीटाकळी येथे 74 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला, मुर्तिजापूर येथे 161 चाचण्या झाल्या त्यात पाच जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, तर अकोला महानगरपालिका येथे 555 चाचण्या झाल्या त्यात 13 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, अकोला आयएमए येथे 15 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला, हेगडेवार लॅब येथे 53 चाचण्या झाल्या त्यात 10 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले,  तर अकोला येथे सहा, बाळापूर येथे 20, पातूर येथे 20, तेल्हारा येथे 28, आरोग्य कर्मचाऱ्यांचे 29, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 26 चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, असे 1015 जणांच्या चाचण्या होऊन त्यात 36 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यात एक  लक्ष 66 हजार 181 चाचण्या झाल्या पैकी 14055 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली आहे.  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ