तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना प्राधान्याने राबवा - पालकमंत्री ना. बच्चू कडू यांचे निर्देश

 





            अकोला,दि.7 (जिमाका)- कोविड-19 ची तिसरी संभाव्य लाट येण्याचे अनुमान वर्तविले जात आहे. या पार्श्वभुमिवर जिल्ह्यात उपचार सुविधा, ऑक्सीजन उपलब्धता, लसीकरण यासारख्या प्रतिबंधात्मक उपाययोजना प्राधान्याने राबविण्याचे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक  मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी दिले.

            तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजना पुर्वतयारी संदर्भात ऑनलाईन आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे बालरोग तंज्ञ डॉ. वरठे तसेच तालुका आरोग्य अधिकारी आदि उपस्थित होते.

कोविड-19 च्या प्रतिबंधात्मक उपाययोजना पुर्वतयारी आढावा बैठकीत पालकमंत्री ना. बच्चू कडू यांनी निर्देश दिले की, संभाव्य तिसऱ्या लाटेचे धोका लक्षात घेऊन  सर्व कोविड केअर सेंटर्स सुसज्ज करुन बालकांसाठी प्रत्येकतालुक्यात बेड राखीव ठेवावे, आरोग्य केंद्रावर ऑक्सिजन उपलब्ध राहील याकरीता नियोजन करावे. जिल्हयात उभारण्यात आलेल्या ऑक्सीजन प्लांटचे कामे पूर्ण झाली असल्याचे खातरजमा करावी. तसेच औषधांची उपलब्धता, सर्व सुविधांनी युक्त रुग्णवाहिका आदी सोईसुविधा प्राधान्याने पूर्ण करावी.  संभाव्य लाटेच्या पार्श्वभुमिवर  लहान बालके व त्यांच्या पालकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी घरोघरी एक माहितीपत्रक व व्हिटामिन च्या गोळ्यांचे पाकीट वाटप करावे. आशावर्कस व अंगणवाडी यांच्यामार्फत अशिक्षित पालकांना आजार व  प्रतिबंधात्मक उपाययोजनाविषयी माहिती द्यावी. तसेच बालकांमध्ये सर्दी, ताप, खोकला असे लक्षणे दिसताच कोरोना चाचण्या कराव्या.  अतिगंभीर आजार असलेल्या बालकांचा शोध घेवून त्यांच्यावर विशेष लक्ष द्यावे. कोरोना ससंर्ग रोखण्यासाठी कोरोना मुक्त गाव मोहिम राबवून कोरोना मुक्त गावांना बक्षीसे देण्याचे निर्देश ऑनलाईन बैठकीत ना. बच्चू कडू यांनी दिले.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ