वाहनचालकांची शिकाऊ अनुज्ञप्ती ऑनलाईन पद्धतीने; गैरमार्गाचा अवलंब झाल्यास कारवाई

 अकोला,दि. १८ (जिमाका)- परिवहन विभागाने शिकाऊ अनुज्ञप्ती चाचणी व शिकाऊ अनुज्ञप्ती परवाना ऑनलाईन पद्धतीनेच जारी करण्याची प्रणाली दि.१४ पासू सुरु केली आहे. तथापि शिकाऊ अनुज्ञप्ती चाचणी ही उमेदवाराऐवजी अन्य अनधिकृत व्यक्ती देत असल्याच्या तक्रारी येत आहेत. केंद्रीय मोटार वाहन नियम ११ अन्वये शिकाऊ अनुज्ञप्ती अर्ज करतांना अर्जदारास केंद्र शासनाने विहित केलेली परीक्षा देणे अनिवार्य आहे. संबंधित उमेदवारास  वाहतुक नियमांचे, चिन्हांचे व वाहन चालकाच्या जबाबदाऱ्यांचे  महत्त्व याची माहिती व्हावी हा या मागील उद्देश आहे. याबाबत पालकांनीही पाल्यास या परीक्षेचे महत्त्व पटवून द्यावे. या प्रणालीचा गैरवापर होऊ नये यासाठी संगणकीय प्रणाली आवश्यक बदलही विभागामार्फत करण्यात येत आहेत. तथापि, गैरमार्गाचा अवलंब झाल्याचे निदर्शनास आल्यास  संबंधित अर्जदाराविरुद्ध  पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल व मोटार वाहन कायदा १९८८ चे कलम १९(इ) अन्वये अनुज्ञप्ती कायमस्वरुपी अपात्र करण्याची कारवाई करण्यात येईल. तसेच या प्रकारास सहाय्य करणारे  अनधिकृत व्यक्ती, मध्यस्त, मोटार ड्रायव्हिंग स्कूल, सायबर कॅफे यांच्या विरुद्धही पोलीसात गुन्हा दाखल करुन ड्रायव्हिंग स्कूलची अनुज्ञप्तीही रद्द करण्यात येईल,असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञानेश्वर हिरडे यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ