122 अहवाल प्राप्त, दोन पॉझिटीव्ह, 13 डिस्चार्ज


           अकोला,दि.28(जिमाका)- आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 122 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 120 अहवाल निगेटीव्ह तर दोन  जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. दरम्यान 13 जणांना  डिस्चार्ज  देण्यात आला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

               त्याच प्रमाणे काल (दि.27) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे  आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 57571(43056+14338+177)  झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी  दिली आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर दोन+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी एक = एकूण पॉझिटीव्ह-तीन

                       शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 291844 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 288365  फेरतपासणीचे 397  तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3082 नमुने होते. आजपर्यंत एकूण 291808 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 248752 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

दोन पॉझिटिव्ह

आज  दिवसभरात दोन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात दोन पुरुषांचा समावेश असून ते तेल्हारा तालुक्यातील आहे. दरम्यान काल (दि.27) रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांच्या अहवालात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख़्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.

13 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून सहा, बिहाडे हॉस्पीटल येथील एक, फातेमा हॉस्पीटल येथील तीन, अवघाते हॉस्पीटल येथील एक, केअर हॉस्पीटल येथील दोन, असे एकूण 13 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

412   जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 57571(43056+14338+177)  आहे. त्यात 1126  मृत झाले आहेत. तर 56033 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 412  जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा