रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः 1162 चाचण्यात 36 पॉझिटीव्ह

 

अकोला,दि.6(जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.5) दिवसभरात झालेल्या 1162 चाचण्या झाल्या त्यात 36  जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

            काल दिवसभरात अकोला येथे 24 चाचण्या झाल्या त्यात दोन  जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, अकोट येथे 126 चाचण्या झाल्या त्यात पाच  जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, तेल्हारा येथे 44 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला, मुर्तिजापूर येथे 253 चाचण्या झाल्या त्यात चार जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, तर अकोला महानगरपालिका येथे 585 चाचण्या झाल्या त्यात 10 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अकोला आयएमए येथे नऊ  चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला,  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 49  चाचण्या झाल्या त्यात आठ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, हेगडेवार लॅब येथे 35 चाचण्या झाल्या त्यात पाच जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले,  तर बाळापूर येथे चार, बार्शीटाकळी येथे पाच, पातूर येथे नऊ, आरोग्य कर्मचाऱ्यांचे 19 चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, असे 1162 जणांच्या चाचण्या होऊन त्यात 36 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यात एक  लक्ष 61 हजार 823 चाचण्या झाल्या पैकी 13968 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली आहे.  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना