अकोला,दि.5(जिमाका)- कोरोना संसर्ग
चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.4) दिवसभरात झालेल्या 1308 चाचण्या झाल्या त्यात 36 जणांचा
अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
काल दिवसभरात अकोट येथे 245 चाचण्या झाल्या त्यात चार जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, तेल्हारा येथे 66 चाचण्या झाल्या त्यात चार जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, मुर्तिजापूर येथे 148 चाचण्या झाल्या त्यात सहा जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, तर अकोला महानगरपालिका येथे 575
चाचण्या झाल्या त्यात पाच जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अकोला
आयएमए येथे 11 चाचण्या झाल्या त्यात एकाचा
अहवाल पॉझिटीव्ह आला, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 68 चाचण्या झाल्या त्यात 12 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, हेगडेवार लॅब येथे 53 चाचण्या झाल्या त्यात चार जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, तर बाळापूर येथे 22, बार्शीटाकळी
येथे 93, पातूर येथे 11, आरोग्य कर्मचाऱ्यांचे 16 चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, असे 1308 जणांच्या चाचण्या होऊन त्यात 36 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले.
आतापर्यंत जिल्ह्यात एक लक्ष 63 हजार 131 चाचण्या झाल्या पैकी 13968 जणांचे
अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून
देण्यात आली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा