रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः 759 चाचण्यात 13 पॉझिटीव्ह

 


अकोला,दि.23(जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.22) दिवसभरात झालेल्या 759 चाचण्या झाल्या त्यात 13  जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

            काल दिवसभरात अकोट येथे 15 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला, तेल्हारा येथे 27 चाचण्या झाल्या त्यात दोन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अकोला महानगरपालिका येथे 370 चाचण्या झाल्या त्यात तीन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, वैद्यकीय महाविद्यालय येथे 65 चाचण्या झाल्या त्यात चार जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, हेगडेवार लॅब येथे 22 चाचण्या झाल्या त्यात तीन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, तर अकोला येथे चार, बाळापूर येथे 56, बार्शीटाकळी येथे नऊ, पातूर येथे 60, मुर्तिजापूर येथे 99, अकोला आयएमए येथे तीन, आरोग्य कर्मचाऱ्यांचे 29 चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, असे 759 जणांच्या चाचण्या होऊन त्यात 13 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यात एक लक्ष 79 हजार 095 चाचण्या झाल्या पैकी 14357 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ