रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः 1094 चाचण्यात 10 पॉझिटीव्ह

अकोला,दि.19(जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.18) दिवसभरात झालेल्या 367 चाचण्या झाल्या त्यात 16  जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

            काल दिवसभरात अकोट येथे 134 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला, तेल्हारा येथे 20 चाचण्या झाल्या त्यात दोन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, मुर्तिजापूर येथे 99 चाचण्या झाल्या त्यात तीन जणाचा अहवाल पॉझिटीव्ह आला, तर अकोला महानगरपालिका येथे 699 चाचण्या झाल्या त्यात दोन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, वैद्यकीय महाविद्यालय येथे 30 चाचण्या झाल्या त्यात दोघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, तर अकोला येथे सहा, बाळापूर येथे 30, बार्शीटाकळी  येथे सात, पातूर येथे 40, अकोला आयएमए येथे चार, आरोग्य कर्मचाऱ्यांचे 25 चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, असे 1094 जणांच्या चाचण्या होऊन त्यात 10 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यात एक लक्ष 76 हजार 195 चाचण्या झाल्या पैकी 14310 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ