670 अहवाल प्राप्त, 10 पॉझिटीव्ह, 75 डिस्चार्ज, दोघांचा मृत्यू


           अकोला,दि.24(जिमाका)- आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 670 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 660 अहवाल निगेटीव्ह तर 10  जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. दरम्यान 75 जणांना  डिस्चार्ज  देण्यात आला, तर दोघांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

               त्याच प्रमाणे काल (दि.23) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 10 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे  आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 57509(43025+14307+177)  झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर 10+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 10 = एकूण पॉझिटीव्ह-20 

                       शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 289915 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 286443  फेरतपासणीचे 396  तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3076 नमुने होते. आजपर्यंत एकूण 289781 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 246756 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

10 पॉझिटिव्ह

 आज  दिवसभरात 10 अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात दोन महिला व आठ पुरुषांचा समावेश आहे. त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे- अकोट-तीन, पातूर-एक, तेल्हारा-तीन, अकोला मनपा क्षेत्र-तीन , दरम्यान काल (दि.23) रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांच्या अहवालात 10  जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख़्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.

दोघांचा मृत्यू

आज दिवसभरात दोघांचा मृत्यूची नोंद झाली.  त्यात अकोली बेस ता.बार्शीटाकळी येथील 65 वर्षीय महिला असून या महिलेस दि. 18 रोजी दाखल केले होते, तर  बार्शीटाकळी येथील 84 वर्षीय महिला असून या महिलेस दि. 20 रोजी दाखल केले होते, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

 

75 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 19, क्रिस्टल हॉस्पीटल येथील एक, जिल्हा परिषद कर्मचार भवन येथील एक, थोटे हॉस्पीटल येथील एक, युनिक हॉस्पीटल येथील सहा, हॉटेल इंद्रप्रस्थ येथील दोन, आयकॉन हॉस्पीटल येथील तीन, ओझोन हॉस्पीटल येथील एक, फातेमा हॉस्पीटल येथील एकडॉ.के.एस. पाटील हॉस्पीटल येथील दोन, अवघते हॉस्पीटल येथील एक, केअर हॉस्पीटल येथील एक, बायस्कर हॉस्पीटल येथील मुर्तिजापूर एक, लोटस मल्टी. हॉस्पीटल  येथील दोन, तर होम आयसोलेशन मधील 33 असे एकूण 75 जणांना डिस्चार्ज देण्यात आला,अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

423 जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 57509(43025+14307+177) आहे. त्यात 1124  मृत झाले आहेत. तर 55962 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 423  जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

००००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ