रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः 1315 चाचण्यात 33 पॉझिटीव्ह

 अकोला,दि.9(जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.8) दिवसभरात झालेल्या 1315 चाचण्या झाल्या त्यात 33  जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

            काल दिवसभरात अकोट येथे 465 चाचण्या झाल्या त्यात तीन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, पातूर येथे 18 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला, तेल्हारा येथे 33 चाचण्या झाल्या त्यात पाच जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला,  मुर्तिजापूर येथे 159 चाचण्या झाल्या त्यात पाच जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, तर अकोला महानगरपालिका येथे 501 चाचण्या झाल्या त्यात सात जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, अकोला आयएमए येथे 12 चाचण्या झाल्या त्यात पाच जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आला, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 50 चाचण्या झाल्या त्यात तीन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले,  हेगडेवार लॅब येथे 34 चाचण्या झाल्या त्यात चार जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले,  तर बाळापूर येथे 17, बार्शीटाकळी येथे सहा, आरोग्य कर्मचाऱ्यांचे 20 चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, असे 1315 जणांच्या चाचण्या होऊन त्यात 33 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यात एक  लक्ष 67 हजार 506 चाचण्या झाल्या पैकी 14088 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली आहे.  

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ