1561 अहवाल प्राप्त, 148 पॉझिटीव्ह, 408 डिस्चार्ज, आठ मृत्यू
अकोला,दि.2(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 1561
अहवाल प्राप्त झाले. त्यातील 1413 अहवाल निगेटीव्ह तर 148 जणांचे अहवाल
पॉझिटीव्ह आले. दरम्यान 408 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, तर आठ जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय
व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
त्याच
प्रमाणे काल (दि.1) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 41 जणांचा अहवाल
पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता एकूण
पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 56058(42118+13763+177)
झाली आहे, अशी माहिती
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर 148 +
रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 41= एकूण पॉझिटीव्ह- 189.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 271497 नमुने तपासण्यात आले. त्यात
प्राथमिक तपासणीचे 268436 फेरतपासणीचे 390 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 2671 नमुने होते.
आजपर्यंत एकूण 271429 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण
निगेटीव्ह अहवालांची संख्या 229311 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली
आहे.
148 पॉझिटिव्ह
आज दिवसभरात 148 अहवाल पॉझिटीव्ह आले.
त्यात 60 महिला व 88 पुरुषांचा समावेश आहे. त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे- मुर्तिजापुर-सहा, अकोट-62, बाळापूर-21, बार्शीटाकळी-
नऊ, पातूर-दोन, तेल्हारा-19 अकोला-29.
(अकोला ग्रामीण-चार, अकोला मनपा क्षेत्र-25), दरम्यान काल
(दि.1) रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांच्या अहवालात 41 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व
ॲक्टीव्ह रुग्ण संख़्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.
408 जणांना
डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयातून 19, आर्युवेदिक महाविद्यालय
येथील एक, युनिक हॉस्पीटल येथील एक, अकोला ॲक्सीडेंट येथील एक,
हार्मोणी हॉस्पीटल येथील एक,
यकिन हॉस्पीटल येथील पाच,
बबन हॉस्पीटल मुर्तिजापूर येथील दोन, गोयंका
गर्ल्स हास्टेल पाच, थोटे हॉस्पीटल येथील दोन, आयकॉन हॉस्पीटल येथील दोन, ओझोन हॉस्पीटल येथील एक,
आधार हॉस्पीटल येथील एक, इंदिरा हॉस्पीटल
येथील दोन, अवघाते
हॉस्पीटल येथील तीन, काळे हॉस्पीटल येथील दोन, केअर हॉस्पीटल येथील दोन, लोटस मल्टी. हॉस्पीटल
येथील आठ, तर होम आयसोलेशन मधील 350 असे
एकूण 408 जणांना डिस्चार्ज देण्यात आला,अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
आठ जणांचे मृत्यू
आज दिवसभरात आठ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात,
पांगरा ता. पातूर येथील 70 वर्षीय पुरुष असून या
रुग्णास दि. 26 मे रोजी दाखल झाले होते.
विवरा ता. पातूर येथील 40 वर्षीय पुरुष असून या
रुग्णास दि. 23 मे रोजी दाखल केले होते.
दाताळा ता. मुर्तिजापूर येथील 55 वर्षीय
महिला असून या महिलेस दि. 24 मे रोजी दाखल केले होते.
शिव नगर येथील 56 वर्षीय पुरुष असून या
रुग्णास दि. 24 मे रोजी दाखल केले होते.
बाळापूर येथील 23 वर्षीय महिला असून या
महिलेस दि. 1 जून रोजी दाखल केले होते.
अकोट येथील 46 वर्षीय पुरुष असून या
रुग्णास दि. 27 मे रोजी दाखल केले होते.
बोरगाव मंजू येथील 69 वर्षीय पुरुष असून या
रुग्णास दि. 30 मे रोजी दाखल केले होते.
बाजोरीया नगर येथील 66 वर्षीय पुरुष असून या
रुग्णास दि. 31 मे रोजी दाखल केले होते, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात
आली.
3894 जणांवर उपचार सुरु
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा