डॉ. पंजाबराव जैविक शेती मिशन: ऑरगेनिक मिशन फार्मस कंपनीचा शनिवारी(दि.5) शुभारंभ

             अकोला,दि.3 (जिमाका)- डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन अंतर्गत विदर्भातील अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, बुलडाणा व वर्धा या सहा जिल्ह्यामध्ये सेंद्रिय शेती करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने  जिल्ह्यात महासंघ ऑरगेनिक मिशन फार्मस प्रोड्युसर कंपनीचा शुभारंभ शनिवार दि.5 रोजी होणार आहे. हा समारंभ दैनिक देशोन्नती प्रेस इमारत, गौरक्षण रोड, अकोला येथे सकाळी 11 वाजता होणार आहे. जैविक शेती करण्याकरीता शेतकऱ्यांचा उत्पादन गट स्थापना करण्यात आले आहे. या शेतकरी उत्पादक गटांच्या समुहनिहाय शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्यात आली असून आतापर्यंत 37 शेतकरी उत्पादक कंपन्यांचा महासंघ स्थापन झाला असल्याची माहिती डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनचे प्रकल्प संचालक यांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना