जिल्हा माहिती कार्यालयाचा उपक्रम, फेसबुकवरुन थेट प्रसारण; राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त पुरुषोत्तम आवारे-पाटील यांचे आज व्याख्यान


अकोला,दि.25(जिमाका)- राजर्षी छत्रपती शाहु महाराजांच्या जयंतीनिमित्त जेष्ठ पत्रकार पुरुषोत्तम आवारे-पाटील(संपादक दै.अजिक्य भारत) यांचे उद्या (दि.26) व्याख्यान होणार आहे. ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे सामाजिक न्यायाचे धोरण’ या विषयावर या व्याख्यानाचे आयोजन असुन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे हे अध्यक्षस्थानी उपस्थित राहणार आहेत.

हा कार्यक्रम मर्यादित व्यक्तिंच्या संख्येत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात सकाळी 11 वाजता होणार असुन जिल्हा माहिती कार्यालय, अकोला यांच्या फेसबुक पेजवरुन हा कार्यक्रम थेट प्रसारित करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा माहिती कार्यालय, अकोला यांच्या फेसबुक पेजवर अधिकाधिक संख्येने भेट द्यावी. www.facebook.com/@dioakola या लिंकवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने यांनी केले आहे.

0000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ