महावेध प्रकल्पअंतर्गत ५२ मंडळात  स्वयंचलित हवामान केंद्र कार्यान्वित

            अकोला, दि.२१ (जिमाका)- महावेध प्रकल्पाअंतर्गत जिल्ह्यातील ५२ मंडळांमध्ये स्वयंचलित हवामान केंद्र  कार्यान्वित झाले आहेत, अशी माहिती  निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली आहे.

अकोला जिल्ह्यातील ५२ महसूल मंडळांमध्ये स्वयंचलित हवामान केंद्र कार्यान्वित झाले आहेत. नैसर्गिक आपत्तीत  झालेल्या नुकसानीची माहिती घेणे, दुष्काळाचे मुल्यांकन,  पर्जन्यमानाचे अहवाल तयार करणे,  तापमान, आर्द्रता, हवेचा वेग, हवेची दिशा, दैनंदिन पर्यन्यमानाची आकडेवारी या स्वयंचलित हवामान केंद्राद्वारे प्राप्त होते. दरम्यान अकोला तालुक्यात काही मंडळांमधील स्वयंचलित हवामान केंद्रांची निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी पाहणी केली. यावेळी तहसिलदार बळवंत आरखराव, स्कायमेट वेदर कंपनीचे  भूषण रिंके, क्षेत्रीय व्यवस्थापक इश्वर मोरे उपस्थित होते.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ