अकोला,दि.7(जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे.
यात काल (दि.6) दिवसभरात
झालेल्या 883 चाचण्या झाल्या त्यात 15 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी
माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
काल दिवसभरात मुर्तिजापूर येथे 93 चाचण्या झाल्या त्यात तीन जणांचे अहवाल
पॉझिटीव्ह आले, तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 50 चाचण्या
झाल्या त्यात दोन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, हेगडेवार लॅब येथे 27 चाचण्या झाल्या त्यात 10 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, तर अकोला येथे 116, बाळापूर येथे 29, तेल्हारा येथे 18, अकोला महानगरपालिका येथे 538, आरोग्य कर्मचाऱ्यांचे 12 चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, असे 883 जणांच्या चाचण्या होऊन त्यात 15 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले.
आतापर्यंत जिल्ह्यात एक लक्ष 65 हजार 176 चाचण्या झाल्या पैकी 14019 जणांचे
अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा