संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाची योजना - कोविडमुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या कुटूंबास पाच लाख रुपयांपर्यंत व्यवसाय कर्ज

 अकोला, दि.२८ (जिमाका)- राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास महामंडळ नवी दिल्ली यांच्यामार्फत  अनुसूचित जातीतील चर्मकार समाजासाठी नवीन योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत कोविड १९ या महामारीमुळे ज्या कुटुंबातील प्रमुख व्यक्ती  मृत्यू पावली आहे, अशा कुटुंबातील प्रमुख वारसदारास व्यवसायासाठी  पाच लाख रुपयांच्या मर्यादेपर्यंत कर्ज देण्यात येणार आहे. या कर्जाचा व्याजदर सहा टक्के असून अधिक माहितीसाठी संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्या. यांच्या कार्यालयात संपर्क साधावा. अधिक माहिती व अर्जाचा नमुना https://forms.gle/Q485fSUQYEuL4xUx7  येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ