छायाचित्र नसलेल्या मतदारांची नावे यादीतून वगळणार; दि. 5 जुलैपर्यंत हरकत-आक्षेप मागविले


            अकोला, दि.29(जिमाका)- मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांकडून छायाचित्र प्राप्त करण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी घरोघरी भेटी दिल्यानंतर काही मतदार हे दिलेल्या पत्त्यावर कायमस्वरुपी राहत नसल्याचे दिसून आले आहे. अशावेळी नावे वगळण्याची कारवाई करणे आवश्यक असते, जिल्ह्यातील अशा छायाचित्र नसलेल्या व दिलेल्या पत्त्यावर आढळत नसलेल्या मतदारांची नावे वगळण्याची प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे. त्यासाठी येत्या दि. 5 जुलै पर्यंत कुणाची हरकत आक्षेप असल्यास ते नोंदवावे, असे अकोला पश्चिम (30) विधानसभा मतदार संघाचे उपजिल्हाधिकारी(महसूल) तथा मतदार नोंदणी अधिकारी गजानन सुरंजे यांनी केले आहे.

भारत निवडणूक आयोगाकडून मतदार यादीत छायाचित्र नसलेल्‍या मतदाराकडून छायाचित्र प्राप्त करून ते मतदार यादीत अंतर्भूत करणे बाबत निर्देश प्राप्‍त झाले आहे. त्‍याअनुषंगाने संबंधीत मतदारांच्‍या घरोघरी मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी  (बी एल ओ)  यांनी डिसेंबर 2019 ते मार्च 2021 या कालावधीत भेटी दिल्या, त्यावेळी मतदार याद्यांमध्‍ये छायाचित्र नसलेल्‍यांपैकी काही मतदार त्‍यांच्‍या मतदार यादीत नमूद असलेल्‍या निवासी पत्‍त्‍यावर कायमस्वरुपी राहत नसल्‍याचे निदर्शनास आले आहे. मतदार यादीत छायाचित्र नसलेले मतदार त्‍यांच्‍या मतदार यादीत नमूद असलेल्‍या निवासी पत्‍त्‍यावर राहत नसल्‍याचे आढळून  येत असल्‍यास, लोकप्रतिनिधी अधिनियम, 1950 व मतदार नोंदणी अधिनियमाच्‍या, 1960 मधील तदतूद व भारत निवडणूक आयोगाच्‍या मार्गदर्शक सुचनांनूसार संबंधित मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्‍याची कार्यवाही करण्‍यात येते.

            त्‍याअनुषंगाने मतदार यादीत फोटो नसलेल्‍या एकूण 24 हजार 214  मतदारांची यादी ही  मतदार नोंदणी अधिकारी, अकोला पश्चिम (30) विधानसभा मतदार संघ, जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला यांचे कार्यालयात सर्व नागरिकांना पाहण्यास उपलब्ध होणार आहे. तसेच ही यादी अकोला जिल्ह्याच्‍या  संकेतस्‍थळावरही प्रसिद्ध करण्‍यात आली आहे. ती पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे. https://akola.gov.in/notice_category/announcements अधिक माहितीकरीता कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक 0724-2426214 संपर्क साधावा.

    ज्‍या मतदारांचे छायाचित्र मतदार यादीमध्‍ये नाही त्‍यांनी त्‍यांचे फोटो व यादीतील नावे वगळण्‍याबाबत आक्षेप असणाऱ्या व्‍यक्तिंनी त्‍यांचा लेखी आक्षेप विहीत मुदतीच्‍या आत संबंधित मतदार नोंदणी अधिकारी 30-पश्चिम विधानसभा मतदार संघ, उपजिल्हाधिकारी (महसूल) जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे नोंदवावे. तसेच  हरकती किंवा आक्षेप वेळेत प्राप्‍त न झाल्‍यास अशा मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्‍याची कार्यवाही ही मतदार नोंदणी अधिकारी यांच्या स्‍तरावरून  करण्‍यात येईल, असे 30-पश्चिम विधानसभा मतदार संघाचे उपजिल्हाधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी गजानन सुरंजे यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ