शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी पीक कर्जाचा लाभ घ्यावा - जिल्हाधिकारी पापळकर यांचे आवाहन; पीक कर्ज व्याज सवलत योजनेस 30 जुन पर्यंत मुदतवाढ

 





अकोला,दि. १७ (जिमाका)- शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी पेरणीच्या आधी पीक कर्ज योजनेचा लाभ घेऊन आपले हंगामाचे आर्थिक नियोजन सुकर करावे,असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे. पीक कर्ज योजनेची प्रक्रिया ही १५ जुलै पर्यंत सुरु ठेवावी,असे निर्देशही जिल्हाधिकारी पापळकर यांनी बॅंकांना दिले आहेत. दरम्यान पीक कर्ज व्याज सवलत योजनेस दि.३० जून पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहितीही देण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात पीक कर्ज योजनेच्या अनुषंगाने खरीप पीक आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस जिल्हाधिकारी पापळकर संबोधित करीत होते. यावेळी स्टेट बॅंक ऑफ इंडीयाचे क्षेत्रिय प्रबंधक श्रीआंशू,  बॅंक ऑफ महाराष्ट्रचे झोनल मॅनेजर अभिजीत चन्दा,  विदर्भ ग्रामीण बॅंकेचे क्षेत्रीय प्रबंधक सुबोध बन्नोरे,  सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाचे सहायक क्षेत्रीय प्रबंधक  ज्ञानेश्वर टापरे,  युनियन बॅंकेचे मुख्य प्रबंधक अतुल मोहोड, जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे  महाव्यवस्थापक सुधाकर  झळके आदी उपस्थित होते.

यावेळी माहिती देण्यात आली की,  गत वर्षीच्या खरीप हंगामाच्या वेळी पीक कर्ज योजनेचा लाभ एक लाख ६४३४ शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला होता. यंदा अद्याप पर्यंत  ६४ हजार ५४६ जणांना ५९३ कोटी ३३ लक्ष रुपयांचे पीक कर्ज वाटप झाले आहे. तथापि, यंदाचा लक्षांक हा एक लक्ष ४२ हजार ५०० इतका असून  जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचवावा, असे  निर्देश जिल्हाधिकारी पापळकर यांनी दिले. अद्यापही  १५ जुलै पर्यंत पीक कर्ज योजनेची मुदत आहे. त्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहनही जिल्हाधिकारी पापळकर  यांनी केले.

पीक कर्ज व्याज सवलत योजनेस

30 जुन र्यं मुदतवाढ

ज्या शेतकऱ्यांनी सन 2020-2021 या वर्षाकरिता अल्पमुदती पीक कर्ज घेतले आहे,अशा शेतकऱ्यांना कर्ज परतफेडीची मुदत बुधवार दि.30 जुन पर्यंत केंद्र शासनाने वाढविलेली असुन तीन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्जावर केंद्र शासनाची व्याज सवलत योजना लागु राहील,असे जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था,अकोला यांनी कळविले आहे.

त्याचप्रमाणे अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या. अकोला आणि जिल्ह्यातील विविध कार्यकारी सेवा संस्था यांच्या मार्फत सन 2020-21 मध्ये केलेल्या खरीप पीक कर्ज परतफेडीस बँकांनी दि.30 जुन पर्यंत मुदतवाढ दिली असुन यामुळे जिल्हा बँक, तसेच सेवा सहकारी संस्थांमार्फत पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनाही या मुदतीत कर्जाची परतफेड केल्यास शून्य टक्के व्याज सवलतीचा लाभ देण्यात येणार आहे.

 तरी शेतकऱ्यांनी त्यांचे पीक कर्जाची परतफेड दि.30 जुन पर्यंत करुन नविन पीक कर्जासाठी पात्र व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर तसेच जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था व्ही. डी. कहाळेकर, जिल्हा अग्रेणी प्रबंधक,सैन्ट्रल बँक ऑफ इंडिया (लिड बँक) आलोक तेरानिया यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ