रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः 856 चाचण्यात सात पॉझिटीव्ह


अकोला,दि.27(जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.26) दिवसभरात झालेल्या 856 चाचण्या झाल्या त्यात सात जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

            काल दिवसभरात अकोट येथे 57 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला,  तेल्हारा येथे 14 चाचण्या झाल्या त्यात दोघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला,  मुर्तिजापूर येथे 20 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अकोला महानगरपालिका येथे 553 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला हेगडेवार लॅब येथे 17 चाचण्या झाल्या त्यात दोघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला,  अकोला येथे 43, बाळापूर येथे 54,  बार्शीटाकळी येथे 25, पातूर येथे 20, अकोला आयएमए येथे दोन, आरोग्य कर्मचाऱ्यांचे 19, वैद्यकीय महाविद्यालय येथे 32 चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, असे 856 जणांच्या चाचण्या होऊन त्यात सात जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यात एक लक्ष 82 हजार 388 चाचण्या झाल्या पैकी 14397 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ