384 अहवाल प्राप्त, पाच पॉझिटीव्ह, 16 डिस्चार्ज

            अकोला,दि.27(जिमाका)- आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 384 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 379 अहवाल निगेटीव्ह तर पाच  जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. दरम्यान 16 जणांना  डिस्चार्ज  देण्यात आला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

               त्याच प्रमाणे काल (दि.26) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये सात जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे  आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 57568(43054+14337+177)  झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी  दिली आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर पाच+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी सात = एकूण पॉझिटीव्ह-12

                       शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 291734 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 288256  फेरतपासणीचे 397  तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3081 नमुने होते. आजपर्यंत एकूण 291686 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 248632 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

पाच पॉझिटिव्ह

आज  दिवसभरात पाच अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात पाच पुरुषांचा समावेश आहे. त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे- अकोट-एक, बाळापूर-एक, अकोला-तीन. (अकोला ग्रामीण-एक, अकोला मनपा क्षेत्र-दोन), दरम्यान काल (दि.26) रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांच्या अहवालात सात  जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख़्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.

16 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून दोन, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथील दोन, सहारा हॉस्पीटल येथील दोन, अवघाते हॉस्पीटल येथील तीन,  थोटे हॉस्पीटल येथील दोन, केअर हॉस्पीटल येथील एक, बायस्कार हॉस्पीटल मुर्तिजापूर येथील दोन, लोटस मल्टी. हॉस्पीटल  येथील दोन, असे एकूण 16 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

422   जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या57568(43054+14337+177) आहे. त्यात 1126  मृत झाले आहेत. तर 56020 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 422  जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

००००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ