रिक्षाचालकांनी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन


        अकोला,दि.8(जिमाका)- कोविड- १९ च्या पार्श्वभुमिवर रिक्षाचालकांना एक वेळ अर्थसहाय्य म्हणून पंधराशे रुपये मानधन देण्याचा शासनाने निर्णय घेतला असून परवानाधारक रिक्षाचालकांना द्यावयाचा लाभ थेट त्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात येत आहे.  त्याअनुषंगाने अकोला जिल्ह्यात आतापर्यंत (दि.6 जून) एकूण 2172 परवानाधारकांना ऑनलाईन अर्जांना मान्यता देण्यात आली असून वाहन मालकाच्या बँक खात्यावर पंधराशे रुपये शासनाकडू जमा करण्यात आले आहे. परंतु अद्यापही जिल्ह्यातील बऱ्याच ॲटोरिक्षा मालकांनी अर्ज सादर केले नाही. तरी सर्व ॲटॉरिक्षा मालकांनी तात्काळ ऑनलाईन अर्ज करुन शासन मदतीचा लाभ घेण्याचे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञानेश्वर हिरडे यांनी केले आहे.

            अनेक ॲटोरिक्षा परवाना धारक चालकाना ऑनलाईन अर्ज करताना त्याचे आधारकार्ड मोबाईल क्रमांकाशी संलग्न नसल्यामुळे ऑनलाईन अर्ज करता आले नाही. आधारकार्ड  मोबाईल क्रमांकाशी संलग्न करण्याकरीता उपप्रादेशिक कार्यालयात काऊंटर सुरु करण्यात आले आहे. तरी ॲटोरिक्षा परवाना धारकांनी कार्यालयात उपस्थित होऊन आपले आधार कार्ड मोबाईल क्रमांकाशी संलग्न करुन घ्यावे. तसेच ॲटोरिक्षा परवानाधारक ऑनलाईन माहिती भरतांना वाहनाचा नोंदणी व लायसंस क्रमांक हा चुकीचा नमुद करीता असल्यामुळे त्यांचे अर्ज परत पाठविण्यात येत आहे. तेव्हा अर्ज सादर करतांना परवानाधारकांनी वाहनांचा नोंदणी क्रमांक व लायसंस क्रमांक अचुक नमुद करावा, असे आवाहन करण्यात आले.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ