1060 अहवाल प्राप्त, 84 पॉझिटीव्ह, 454 डिस्चार्ज, सहा मृत्यू

 


           अकोला,दि.5(जिमाका)- आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 1060 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 976 अहवाल निगेटीव्ह तर 84  जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. दरम्यान 454  जणांना  डिस्चार्ज  देण्यात आला, तर हा जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

               त्याच प्रमाणे काल (दि.4) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 36 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे  आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 56511(42418+13916+177)  झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर 84 + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 36= एकूण पॉझिटीव्ह- 120.

 

                       शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 276202 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 273134 फेरतपासणीचे 390 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 2678 नमुने होते. आजपर्यंत एकूण 276050 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 233632 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

84 पॉझिटिव्ह

आज  दिवसभरात 84 अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 31 महिला व 53 पुरुषांचा समावेश आहे. त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे- मुर्तिजापुर-दोन, अकोट-27, बाळापूर-नऊ, बार्शीटाकळी- दोन, पातूर-तीन, तेल्हारा-सात अकोला-34. (अकोला ग्रामीण-17, अकोला मनपा क्षेत्र-17), दरम्यान काल (दि.4) रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांच्या अहवालात 36  जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख़्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.

454 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 19, बबन हॉस्पीटल मुर्तिजापूर येथील एक, उशाई हॉस्पीटल येथील एक, थोटे हॉस्पीटल येथील पाच, समर्पण हॉस्पीटल येथील तीन, आयकॉन हॉस्पीटल येथील दोन, ओझोन हॉस्पीटल येथील दोन, बिहाडे हॉस्पीटल येथील दोन, फतेमा हॉस्पीटल येथील  एक, डॉ.के.एस. पाटील हॉस्पीटल येथील दोन, अर्थव हॉस्पीटल येथील एक, अवघाते हॉस्पीटल येथील एक, काळे हॉस्पीटल येथील दोन, केअर हॉस्पीटल येथील दोन, तर होम आयसोलेशन मधील 410 असे एकूण 454 जणांना डिस्चार्ज देण्यात आला,अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

 हा जणांचे मृत्यू

आज दिवसभरात सहा जणांचा मृत्यू झाला. त्यात,

अकोली जहागीर ता.अकोट येथील 47 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 25 मे रोजी दाखल केले होते.

आलेगाव ता. पातूर येथील 47 वर्षीय महिला असून या महिलेस दि. 3 जून रोजी दाखल केले होते.

मुर्तिजापूर येथील 45 वर्षीय महिला असून या महिलेस दि. 30 मे रोजी दाखल केले होते.

उमरा ता. पातूर येथील 73 वर्षीय महिला असून या महिलेस दि. 26 मे रोजी दाखल केले होते.

कान्हेरी गवळी ता. बाळापूर येथील 65 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 4 जून रोजी दाखल केले होते.

80 वर्षीय अज्ञात पुरुष असून या रुग्णास दि. 4 जून रोजी मृतावस्थेत दाखल केले होते, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

3036 जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 56511(42418+13916+177) आहे. त्यात 1101 मृत झाले आहेत. तर 52374 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 3036 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना