रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः 1656 चाचण्यात 58 पॉझिटीव्ह
अकोला,दि.3(जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे.
यात काल (दि.1) दिवसभरात
झालेल्या 1656 चाचण्या झाल्या त्यात 58 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी
माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
काल दिवसभरात अकोट 275 चाचण्या
झाल्या त्यात 11 जणांचे
अहवाल पॉझिटीव्ह आले, बाळापूर येथे 17 चाचण्या
झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला, बार्शीटाकळी
येथे 48 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल
पॉझिटीव्ह आला, तेल्हारा येथे 77 चाचण्या झाल्या त्यात सात जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, मुर्तिजापूर
येथे 158 चाचण्या झाल्या त्यात सहा जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, तर
अकोला महानगरपालिका येथे 875 चाचण्या
झाल्या त्यात आठ जणांचा अहवाल
पॉझिटीव्ह आला, शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयात 69 चाचण्या झाल्या त्यात 11 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, हेगडेवार
लॅब येथे 63 चाचण्या झाल्या त्यात 13 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, तर पातूर येथे 38, अकोला आयएमए येथे 13, आरोग्य कर्मचाऱ्यांचे 23 चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, असे 1656 जणांच्या चाचण्या होऊन त्यात 58 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यात एक लक्ष 60 हजार 338 चाचण्या झाल्या पैकी 13873 जणांचे
अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, अशी
माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा