690 अहवाल प्राप्त, नऊ पॉझिटीव्ह, 23 डिस्चार्ज

 


           अकोला,दि.30(जिमाका)- आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 690 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 681 अहवाल निगेटीव्ह तर नऊ  जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. दरम्यान 23 जणांना  डिस्चार्ज  देण्यात आला,  असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

               त्याच प्रमाणे काल (दि.29) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये पाच जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे  आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 57595(43072+14346+177)  झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी  दिली आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर नऊ+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी पाच = एकूण पॉझिटीव्ह-14

                       शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 293147 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 289664  फेरतपासणीचे 397  तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3086  नमुने होते. आजपर्यंत एकूण 293120 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 250048 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

नऊ पॉझिटिव्ह

आज  दिवसभरात नऊ अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात तीन महिला व सहा पुरुषांचा समावेश आहे. त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे- मुर्तिजापूर-एक, तेल्हारा-एक, अकोट-दोन, अकोला-पाच (अकोला ग्रामीण-दोन, अकोला मनपा क्षेत्र- तीन), दरम्यान काल (दि.29) रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांच्या अहवालात पाच जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख़्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.

23 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून चार, गोयंका गर्ल्स हॉस्टेल येथील दोन, हॉटेल इंद्रप्रस्त येथील एक, आयकॉन हॉस्पीटल येथील एक, तर होम आयसोलेशन मधील 15 असे एकूण 23 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

377   जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 57595(43072+14346+177)  आहे. त्यात 1127  मृत झाले आहेत. तर 56091 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 377  जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

००००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम