कावड उत्सवाच्या नियोजनासाठी गुरूवारी नियोजनभवनात बैठक
कावड उत्सवाच्या नियोजनासाठी गुरूवारी नियोजनभवनात बैठक अकोला, दि. ७ : श्रावणातील कावड व पालखी उत्सवानिमित्त आवश्यक सुविधा, कायदे व सुव्यवस्था आदींबाबत नियोजन करण्यासाठी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या अध्यक्षतेत सर्व यंत्रणांची बैठक गुरूवारी (१० जुलै) दु. ४ वा. नियोजनभवनात होणार आहे. कावड यात्रेच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था, तसेच इतर सोयीसुविधा, बंदोबस्त याबाबत बैठकीत चर्चा होईल. यंदा 25 जुलै रोजी श्रावणास प्रारंभ होत आहे. दि. 28 जुलै रोजी पहिला श्रावण सोमवार, दि. 4 ऑगस्ट रोजी दुसरा, दि. 11 ऑगस्टला तिसरा (श्री क्षेत्र धारगड यात्रा), तसेच दि. 18 ऑगस्ट रोजी चौथा श्रावण सोमवार (कावड व पालखी मिरवणूक) आहे. जिल्ह्यात कावड यात्रेनिमित्त भक्त मोठ्या संख्येने मौजे गांधीग्राम येथे पूर्णा नदीच्या पात्राजवळ एकत्र येतात व मध्यरात्रीनंतर कावडधारी पूर्णा नदीचे जल कावडीत घेऊन अकोला येथील श्री राजराजेश्वर मंदिरात श्री महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक करतात. या यात्रेचा मार्ग -आपातापा नाका, रेल्वे ब्रीज, शिवाजी महाविद्यालय, अकोट स्टॅण्ड, मामा बेकरी, बियानी चौक, कापड बाजार, सराफा लाई...