मुलींच्या आयटीआय येथे ऑनलाईन पध्दतीने प्रवेश

 


        अकोला,दि.24 (जिमाका)-शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था(मुलींची) अकोला या संस्थेमध्ये ऑगस्ट 2020 या सत्राकरीता केंद्रीय ऑनलाइन पध्दतीने प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम मुदत सोमवार (दि. 31) रोजी सायं. 5 वाजेपर्यंत आहे. प्रवेश इच्छुकांनी www.admision.dvet.in वर जाऊन अर्ज ऑनलाईन नोंदणी करावा.

            या संस्थेमध्ये इंजिनिअरीग ट्रेड मध्ये इंन्टरीअर डिझाइन ॲन्ड डेकोरेशन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी तसेच नॉन इंजिनिअंरीग ट्रेड मध्ये कॉम्पुटर ऑपरेटर ॲन्ड प्रोग्रामिंग असिस्टंट, सेक्रेटियल प्रॅक्टीस(इंग्रजी) फ्रुट्स ॲण्ड व्हिजीटेबल प्रोसेसिंग, बेकर ॲण्ड कन्फेक्शनर, ड्रेस मेकींग, बेसिक कॉस्मेटोलॉजी व फॅशन डिझाईन ॲण्ड टेक्नालॉजी या व्यवसायाकरीता प्रवेश उपलब्ध आहेत.

            अकोला जिल्ह्यामध्ये  शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था महिला व मुलींकरीता राखीव असल्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी व मुलींनी या संधीचा लाभ घ्यावा. हिला, मुलींन करीता वयाची अट नाही, महाराष्ट्रातील कुठल्याही जिल्हा किवा तालुक्यातील मुलीं किंवा महिला अर्ज करुन शकतात. तसेच रोजगार व  स्वयंरोजगार संधी उपलब्ध आहेत. अधिक माहिती करीता www.admision.dvet.gov.in या संकेतस्थळावर माहिती पुस्तीका उपलब्ध असून  प्रवेशबाबत काही अडचण असल्यास संस्थेमध्ये मार्गदर्शन सत्र सकाळी 10 ते 11 या वेळेत उपलब्ध राहील, असे औद्योगिक प्रशिक्षण संस्थाचे (मुलींची) प्राचार्य आर. टि. मुळे यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ