2 लाख 4 हजार 582 शेतकऱ्यांनी काढला पिक विमा



        अकोला,दि.1(जिमाका)- जिल्ह्यात प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2020 करिता शेतकऱ्यांकडून पिक विमा अर्ज जमा करण्यात आले आहे. 31 जुलै ही प्रधानमंत्री पिका विमा योजनेची अंतिम तारिख होती. आतापर्यंत 2 लाख 4 हजार 582 शेतकऱ्यांनी पिक विमा काढण्यात आले आहे. यात 1 लाख 92 हजार 715  बिगर कर्जदार शेतकऱ्यांचा समावेश असून 11 हजार 867 कर्जदार शेतकऱ्यांचा समावेश आहे. कॉमन सर्व्हिस सेंटरच्या माध्यमातून 1 लाख 92 हजार 612 शेतकऱ्यांनी तर बँकेच्या माध्यमातून 11 हजार 970 शेतकऱ्यांनी पिकविमा काढला आहे.   यात अकोला तालुक्यातील 43 हजार 846, अकोट तालुक्यातील 31 हजार 459, बाळापूर तालुक्यातील 33 हजार 869, बार्शिटाकळी तालुक्यातील 23 हजार 426, मुर्तिजापूर तालुक्यातील 31 हजार 315, पातूर तालुक्यातील 17 हजार 729, तेल्हारा तालुक्यातील 22 हजार 898 शेतकऱ्यांचा समावेश आहे.
            प्रधानमंत्री पिकविमा योजनेमध्ये जिल्हयातील 1 लाख 69 हजार 921 हेक्टर क्षेत्राचा पिक विमा काढण्यात आला आहे. यामध्ये 13 कोटी 98 लाख 80 हजार 777 रुपयांचा शेतकऱ्यांचा वाटा आहे.  राज्य शासन व केन्द्र शासनाचा प्रत्येकी 47 कोटी 3 लाख 17 हजार 513 रुपयांचा वाटा आहे. 640 कोटी 68 लाख 10 हजार 153 रुपयांचा एकूण पिक विमा उतरविण्यात आला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना