326 अहवाल प्राप्त; 65 पॉझिटीव्ह, 61 डिस्चार्ज, एक मयत
अकोला,दि.31(जिमाका)-आज दिवसभरात शासकीय
वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग
तपासणीचे 326 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 261 अहवाल
निगेटीव्ह तर 65 अहवाल पॉझिटीव्ह आले.
त्याच प्रमाणे काल (दि.
30) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये नऊ तर खाजगी लॅब
मध्ये आठ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे आता
अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या
4024 (3221+725+78)
झाली आहे. आज दिवसभरात
61 रुग्ण बरे झाले, अशी माहिती शासकीय
वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त
माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 27840 जणांचे
नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 27124, फेरतपासणीचे
178 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 538 नमुने
होते. आजपर्यंत एकूण 27643 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण
निगेटीव्ह अहवालांची संख्या 24422 तर पॉझिटीव्ह अहवाल 4024 (3221+725+78) आहेत, अशी माहिती
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
आज
65 पॉझिटिव्ह
दरम्यान आज दिवसभरात 65 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात आज सकाळी 63 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.
त्यात 26 महिला व 37 पुरुष आहे. त्यात जसगाव येथील 13 जण, निंबा येथील नऊ जण, पिंपळखुटा येथील चार जण, मुर्तिजापूर येथील तीन जण, सस्ती ता.पातूर, जीएमसी, मोठी उमरी, जूने शहर,
डाबकी रोड, जठारपेठ व सिरसोली ता. तेल्हारा
येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरित रुईखेड, चतारी ता.पातूर, उमरा ता. अकोट, सिरसो ता. मुर्तिजापूर, जय हिंद चौक, वरुर जऊळका ता. अकोट, मोऱ्हाळ ता. बार्शीटाकळी, रेणुका नगर, तारफैल, किर्ती नगर, सहकार नगर,
खडकी, अमानखा प्लॉट, अकोट,मुरबा ता. मुर्तिजापूर, निमवाडी, सिंदखेड ता.बार्शीटाकळी, वाडेगाव,भिम नगर व शिवर येथील प्रत्येकी
एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तसेच आज सायंकाळी दोन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात एक
महिला व एक पुरुष आहे. ते दोघही पिंपळखुटा, ता. पातूर येथील
रहिवासी आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा
रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
काल रात्री रॅपिड ॲटीजेन टेस्टमध्ये नऊ जणांचा
अहवाल पॉझिटीव्ह आला होता. तसेच ध्रुव पॅथॉलॉजी लॅब नागपूर या खाजगी प्रयोगशाळेत
झालेल्या चाचण्यात आठ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. या
चाचण्या डॉ. हेडगेवार हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर, अकोला यांच्या मार्फत
राबविण्यात येत आहेत. त्यांचाही समावेश आजच्या अहवालात करण्यात आला आहे, अशी
माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
एक मयत
दरम्यान आज एका जणाचा मृत्यू झाला.
हा रुग्ण सस्ती ता. पातूर येथील 57 वर्षीय पुरुष असून तो दि. 19 ऑगस्ट रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला.
61 जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयातून 47 जणांना, कोविड केअर
सेंटर येथून 10 जण, उपजिल्हा रुग्णालय,
मुर्तिजापूर येथील दोन जण, ओझोन हॉस्पीटल येथून एक जण, तर हॉटेल रेजेन्सी येथून एक जण,
अशा एकूण 61 जणांना डिस्चार्ज देण्यात आला,
अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.
642 रुग्णांवर उपचार सुरु
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा