महाडीबीटी पोर्टलवरील मंजूर शिष्यवृत्ती जमा होण्यासाठी आधार क्रमांक व बॅंक खाते संलग्नता आवश्यक

 अकोला,दि.२८ (जिमाका)- महाडीबीटी प्रणालीद्वारे सामाजिक न्याय विभागातर्फे देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यात थेट जमा होण्यासाठी  बॅंक खाते व आधार क्रमांक संलग्नता आवश्यक आहे. यासंदर्भात  जी प्रकरणे  प्रलंबित आहेत  त्याप्रकरणी विद्यार्थ्यांचे आधार क्र्मांक व बँक खाते  त्यांच्यास्तरावरून जसे जसे अद्यावत केले जाईल, त्याप्रमाणे शिष्यवृत्तीची रक्कम त्यांच्या बँक खात्यात आपोआप जमा होणार असल्याचे महाडीबीटी पोर्टलचे तांत्रिक कक्ष व राज्य शासनाचे माहिती व तंत्रज्ञान संचालनालय यांनी शासनास कळविले असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त समाज कल्याण,अकोला यांनी दिली आहे.

महाडीबीटी पोर्टलवरून सन २०१९-२० मध्ये मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीच्या मंजूर झालेल्या अर्जानुसार विद्यार्थ्यांचे तसेच महाविद्यालयाचे पहिला/दुसरा हप्ता किंवा दोन्ही हप्त्याचे अर्ज मंजूर होऊन देखील देय होणारी शिष्यवृत्ती रक्कम अद्यापही संबंधित लाभार्थी /महाविद्यालयाच्या बँक खात्यात जमा होत नसल्याचे विविध,पालक तसेच विविध संघटनांनी  आयुक्तालयाचे व शासनाच्या वेळोवेळी निदर्शनास आणून दिले आहे. त्याअनुषंगाने वरील बा्बीवर आयुक्तालयाकडून निराकरण प्राप्त झाले आहे.

त्यानुसार, अशा अर्जावर संबंधित सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण यांनी प्रणालीद्वारे ऑनलाईन मान्यता प्रदान केल्यावर आयुक्तालय स्तरावरुन त्याचे देयके तयार करून कोषागाराकडून देय असलेली रक्कम पारित करून महाडिबीटी पोर्टलच्या pool बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेली आहे. सदर देय असलेली रक्कम ही PFMS या केंद्रभूत वितरण प्रणालीमधून विद्यार्थ्यांच्या व महाविद्यालयांच्या बँक खात्यामध्ये थेट महाडीबीटी प्रणालीदवारे जमा होणे अपेक्षित आहे. तदपूर्वी PEMSप्रणालीतून वितरण करण्यापूर्वी लाभार्थ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास संलग्न असल्याचे NPCI या केंद्रभूत पडताळणी प्रणालीतून मान्य झालेल्या पात्र लाभार्थ्यांचे आधार व बँक खात्याची पडताळणी करण्यात येते. तथापि या पडताळणी प्रक्रियेस PFMS NPCI यांच्याच स्तरावर विलंब होत असल्याचे विभागाच्या निदर्शनास आले आहे. याबाबत आयुक्तालय स्तरावरून माहिती व तंत्रज्ञान संचालनालयास तसेच राज्य स्तरावरील PFMS NPCI कार्यालयांना वारंवार पाठपुरावा करण्यात येत आहे.

याशिवाय, देयके जनरेट झालेल्या अर्जापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांच्या खात्यात शिष्यवृत्तीचे वितरण सद्यस्थितीत महाडिबीटी प्रणालीवरील (Pool account) PFMS या प्रणलीदवारे चालू असून सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची रक्कम आधार संलग्न बॅंक खात्यात अद्याप जमा व्हायची आहे. ही रक्कम PFMS प्रणालीदवारे वितरित होण्यास खालील कारणांमुळे विलंब होत आहे.

१. नॉन आधार अर्ज नोंदणी केलेल्या अर्जामध्ये आधार क्रमांक अद्यावत नसणे.

२. विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक त्यांच्या बँक खात्याशी संलग्न नसणे.

३.विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक इनोंक्टिव्ह असणे.

४. विद्यार्थ्यांनी व्हाऊचर रिडीम न करणे.

५. विद्यार्थ्यांचे आधार संलग्न असलेले बँकेतील खाते बंद असणे.

६. विद्यार्थ्यांचे आधार संलग्न मोबाईल क्रमांक बंद असणे.

७. दुसऱ्या हप्त्यासाठी महाविद्यालय स्तरावर विद्यार्थ्यांची उपस्थिती अद्यावत करण्याकरिता अर्ज प्रलंबित असणे.

या सर्व बाबी विद्यार्थ्यांच्या आधार व बँक खात्याशी निगडित असून त्या त्यांच्यास्तरावरून जसे जसे अद्यावत

केले जाईल त्याप्रमाणे विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची रक्कम त्यांच्या बँक खात्यात आपोआप जमा होणार असल्याने

महाडीबीटी पोर्टलचे तांत्रिक कक्ष व राज्य शासनाचे माहिती व तंत्रज्ञान संचालनालय यांनी शासनास कळविले आहे. वरील कारणामुळे शिष्यवृत्ती/फ्रीशीपच्या रकमेचे वितरणामध्ये विलंब होत असल्याची बाब सर्व विद्यार्थी, पालक,महाविद्यालये,विद्यार्थी संघटना,संबंधित सेवाभावी संस्था यांचे निदर्शनास सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण अकोला यांनी आणून दिले आहे. जेणेकरून त्यांचेमध्ये निर्माण झालेल्या संभ्रमाचे निराकरण होऊ शकेल, असेही कळविण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ