रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 43 चाचण्या, तीन पॉझिटिव्ह



        अकोला,दि. 3 (जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 43 चाचण्यामध्ये तीन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.
            आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे- अकोला ग्रामिण,  अकोट, बाळापूर, पातूर व तेल्हारा येथे चाचण्या झाल्या नाहीत. बार्शीटाकळी येथे  सहा चाचण्या झाल्या त्यात कोणचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, मुर्तिजापूर येथे 19 चाचण्या झाल्या त्यात तीन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.  तसेच अकोला मनपामध्ये  चाचण्या झाल्या नाही, अकोला जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या 17 जणांच्या चाचण्या घेण्यात आल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही.  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकाची चाचणी झाली त्यात कोणचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, असे एकूण 43 चाचण्या होऊन त्यात तीन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. आतापर्यंत जिल्ह्यात 7848 चाचण्या झाल्या असून 375 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना