लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने अभिवादन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे कार्य समाजाला प्रेरणादायी
अकोला,दि.1(जिमाका)- आज एक ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये लोकशाहीर
अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले, याप्रसंगी
प्रतिमाचे पूजन करून निवासी
उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी हार अर्पण
करून अभिवादन केले, याप्रसंगी अधीक्षक मीरा पागोरे, जिल्हा नाझर निलेश
दामोदर, कैलास गणेशपूरे, अविनाश चव्हाण, मनोज वावरे उपस्थिती होते
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे कार्य प्रेरणादायी आहे. त्यांनी साहित्याच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे कार्य केले. सामाजिक
सुधारणा चळवळीत त्यांनी मोलाचे योगदान दिले, त्यांनी फकिरा कांदबरीच्या माध्यमातून सामाजिक
अन्यायाविरुद्ध लढणारा नायक समाजाला अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या
कार्याचा आदर्श घेऊन मार्गक्रमण करण्याची आज आवश्यकता असल्याचे संजय खडसे यांनी या प्रसंगी सांगितले.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा