पर्यटकांना धरण व सिंचन प्रकल्पावर प्रवेशास बंदी

 

अकोला,दि.19(जिमाका)-   जिल्ह्यात आजपर्यत सरासरी 635.10 मि.मी. पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मोठे, मध्यम व लघू प्रकल्पामध्ये मोठया प्रमाणात पाणीसाठा जमा झाला आहे. पोपटखेड, घुंगसी व शहानूर या प्रकल्पाच्या ठिकाणी गणेश विसर्जन, देवी विसर्जन तसेच या प्रकल्प क्षेत्रामध्ये मोठया प्रमाणात पर्यटनासाठी येतात. यापुर्वी अशा प्रकल्पामध्ये बुडून मृत्यू झाल्याच्या घटना झाल्या आहे. त्याअनुषंगाने आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टिने या प्रकल्पाच्या ठिकाणी पर्यटकांना प्रवेशास बंदी करण्यात आली असल्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहे.

जिल्ह्यात दोन मोठे, पाच मध्यम व 33 लघू पाटबंधारे प्रकल्प आहे. या प्रकल्पामध्ये सध्या मोठ्याप्रमाणात जलसाठा आहे. पुढील काळात जलसाठ्यात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा प्रकल्पामध्ये गणेश विसर्जन, देवी विसर्जन व पर्यटनासाठी निर्बंध  घालण्यात आले आहे. याची जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी, असे जिल्हा प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ