रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 141 चाचण्या, पाच पॉझिटिव्ह

        अकोला,दि.12 (जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 141 चाचण्यामध्ये  केवळ पाच जणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.

            आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे- अकोला ग्रामीण,  पातूर, बाळापूर व तेल्हारा येथे चाचण्या झाला नाही. अकोट येथे 15 चाचण्या झाल्या त्यात दोन पॉझिटीव्ह आले, बार्शीटाकळी येथे चार चाचण्या झाल्या त्यात एक जणांचा अहवाल पाझिटिव्ह आला, मुर्तिजापूर येथे 21 चाचण्या झाल्या त्यात एक पॉझिटीव्ह आला,  तसेच अकोला मनपा येथे 84 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह  आला, वैद्यकीय कर्मचाऱ्यांपैकी 17 जणांच्या चाचण्या झाल्या त्यात कुणीही पॉझिटीव्ह आला नाही, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आज चाचण्या झाल्या नाही, अशा प्रकारे दिवसभरात 141 जणांच्या चाचण्या झाल्या त्यात पाच अहवाल पॉझिटीव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यात 10118 चाचण्या झाल्या असून 508 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ