33 अहवाल प्राप्त; तीन पॉझिटीव्ह, 39 डिस्चार्ज, एक मयत

 अकोला,दि.17 (जिमाका)-आज दिवसभरात (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 33 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 30 अहवाल निगेटीव्ह तर  तीन अहवाल पॉझिटीव्ह आले. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 3251(2727+524) झाली आहे. आज दिवसभरात 39 रुग्ण बरे झाले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 23943 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 23293, फेरतपासणीचे 172 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे  478  नमुने होते. आजपर्यंत एकूण 23834 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 21107 आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल 3251(2727+524)  आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आज तीन पॉझिटिव्ह

आज दिवसभरात तीन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात दोन महिला व एक पुरुष आहेत. त्यातील वाडेगाव, गुलजारपुरा व हिवरखेड येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तसेच आज सायंकाळी कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, काल रात्री प्राप्त झालेल्या रॅपिड अँटीजन टेस्ट मध्ये सहा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे.

एक मयत

दरम्यान आज एकाचा मृत्यू झाला.  तो हिवरखेड ता. तेल्हारा येथील 72 वर्षीय पुरुष असून तो दि. 13 ऑगस्ट रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला.

39 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 16 जणांना, कोविड केअर सेंटर येथून नऊ जण, उपजिल्हा रुग्णालय, मुर्तिजापूर येथून सात जण, हॉटेल रेजेन्सी येथून एक जण तर आयकॉन हॉस्पीटल येथून सहा जणांना अशा एकूण 39 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.

420 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 3251(2727+524)  आहे. त्यातील  136 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची  2695 संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 420 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ