३२४अहवाल प्राप्त; ५५ पॉझिटीव्ह, १८ डिस्चार्ज

 अकोला,दि. ६ (जिमाका)-आज दिवसभरात (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे ३२४ अहवाल प्राप्त झाले. त्यातील २६९अहवाल निगेटीव्ह तर  ५५ अहवाल पॉझिटीव्ह आले. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या २८८०(२४३९+४४१) झाली आहे. आज दिवसभरात १८ रुग्ण बरे झाले. आता ४६३ जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण २०९८३ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे २०३९२, फेरतपासणीचे १६७ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे  ४२४  नमुने होते. आजपर्यंत एकूण २०८९५ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या १८४५६   आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल २८८०(२४३९+४४१)आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आज ५५ पॉझिटिव्ह

आज दिवसभरात ५५जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यातआज सकाळी ४१ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यात २३ महिला व १८ पुरुष आहेत. त्यात अकोट येथील १२, आगर ता. अकोला येथील सात, शास्त्रीनगर सहा, सिंधी कॅम्प चार, पुनोती ता. बार्शी टाकळी येथील तीन तर रामनगर, कौलखेड, शिवनी, वाशीम बायपास, जुना कॉटन मार्केट, गणेश नगर, गोरक्षण रोड, डाळंबी ता. अकोला व सांगवा मेळ ता. मुर्तिजापूर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तर आज सायंकाळी १४ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यात नऊ महिला व पाच पुरुष आहेत. त्यात वाडेगाव येथील नऊ, रिधोरा येथील तीन तर पुनोती ता. बार्शी टाकळी येथील दोन जण याप्रमाणे रहिवासी आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान काल(दि.५) रात्री प्राप्त झालेल्या रॅपिड ॲन्टीजेन चाचणी अहवालात २५ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत करण्यात आला आहे.

 

१८ जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १० मुर्तिजापुर उपजिल्हा रुग्णालयातून दोन, आयकॉन हॉस्पिटल येथून तीन व ओझोन हॉस्पिटल येथून तीन  अशा १८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.

४६३ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या २८८०(२४३९+४४१) आहे. त्यातील  जण ११३ मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची  २३०४ संख्या  आहे. तर सद्यस्थितीत ४६३ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ