रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 165 चाचण्या, 14 पॉझिटिव्ह

 


        अकोला,दि.10 (जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 165 चाचण्यामध्ये  केवळ 14 जणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.

            आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे- अकोला ग्रामीण, बाळापूर, पातूर व तेल्हारा येथे चाचण्या झाला नाही. अकोट तेथे 45 चाचण्या झाल्या त्यात सात पॉझिटीव्ह आले, बार्शीटाकळी तेथे आठ चाचण्या झाल्या त्यात एक पॉझिटीव्ह आला, मुर्तिजापूर येथे 60 चाचण्या झाल्या त्यात दोन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले तसेच  अकोला मनपा येथे 31 चाचण्या झाल्या त्यात चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह  आले, वैद्यकीय कर्मचाऱ्यांपैकी 19 जणांच्या चाचण्या झाल्या त्यात कुणीही पॉझिटीव्ह आले नाही, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दोन चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, अशा प्रकारे दिवसभरात 165 जणांच्या चाचण्या झाल्या त्यात 14 अहवाल पॉझिटीव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यात 9768 चाचण्या झाल्या असून 496 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ