मुंबई येथे 11 सप्टेंबर रोजी पेन्शन अदालत तक्रार 6 ऑगस्ट पुर्वी पाठवावी



अकोला,दि.4(जिमाका)- भारतीय डाक विभागामधील  सेवानिवृत्त कर्मचारी यांची सेवा निवृतीच्या लाभ थकीत असल्यास किवा त्या संबंधी तक्रार असल्यास तक्रारीचे निवारण लवकर होण्यासाठी आपण पेन्शन अदालत मध्ये दाद मागू शकता. यासाठी अनुतरीत तक्रारबाबत अर्ज व त्या सोबत मूळ तक्रारीची प्रत ज्या अधिकाऱ्याकडे दाखल केली त्याचा हुद्दा व दाखल केल्याची तारीख तसेच एका अर्जासोबत एकाच तक्रार असावी. आपली तक्रार गुरुवार (दि. 6) पूर्वी समक्ष अथवा प्रवर डाक अधिक्षक, अकोला विभाग, सिव्हील लाईन्स, अकोला या पत्त्यावर पोस्टाने पाठवावी. , असे आवाहन प्रवर डाक अधिक्षक यांनी केले.  
सर्कल लेवल पेन्शन अदालत  दि. 11 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वा. मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र मंडळ, मुंबई यांचे कार्यालय येथे राहील. तसेच क्षेत्रीय पेन्शन अदालत दि.14ऑक्टोंबर रोजी सकाळी 11 वा. पोस्टमास्तर जनरल, नागपूर क्षेत्रीय कार्यालय, नागपूर येथे राहील, असे आवाहन प्रवर डाक अधिक्षक यांनी केले.   

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ