भारत वृक्ष क्रांती मोहिमे अंतर्गत 'एक विद्यार्थी एक वृक्ष' उपक्रमाचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते शुभारंभ


 

            अकोला,दि.16 (जिमाका)- आज भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर स्थानिक जिल्हा परिषद आगरकर विद्यालयांमध्ये वृक्षारोपण करून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी ‘एक विद्यार्थी एक वृक्ष’ या उपक्रमाचा शुभारंभ केला. या उपक्रमा अंतर्गत अकोला जिल्ह्यामध्ये प्राथमिक आणि माध्यमिक शाळातील मिळून  एकूण सुमारे 2 लाख 70 हजार विद्यार्थी  20 ऑगस्ट 2020 पर्यंत आपल्या घरी किंवा शेतीमध्ये एका झाडाची लागवड करणार आहेत. या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना सामाजिक वनीकरण विभागामार्फत स्व. वसंतराव नाईक वृक्ष लागवड योजने अंतर्गत ग्रामपंचायत आणि शाळा यांच्या मदतीने    वृक्ष वाटप केले जाणार आहे.

            आज संपन्न झालेल्या कार्यक्रमांमध्ये   मुख्य कार्यकारी अधिकारी   सौरभ कटिहार, उपसंचालक सामाजिक वनीकरण विजय माने, निवासी उपजिल्हाधिकारी प्रा .संजय खडसे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, उपजिल्हाधिकारी रोहयो बाबासाहेब गाढवे, जिल्हा नियोजन अधिकारी ज्ञानेश्वर आंबेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजीव फडके, तहसीलदार   विजय लोखंडे, उपशिक्षणाधिकारी वाशिम प्रकाश अंधारे, भारत वृक्ष क्रांती मिशनचे  संस्थापक आणि एक विद्यार्थी एक वृक्ष या उपक्रमाचे प्रणेता ए एस नाथन सुरेशचंद्र जगताप, Govind बलोदे, शरद वाघ, आगरकर  विद्यालयाचे  प्राचार्य वाल्मीक भगत  आणि सर्व शिक्षक वृंद   यांच्या सहभागाने जिल्हाधिकारी   यांनी आगरकर कॉलनी मध्ये जावून विद्यार्थ्यांना वृक्ष वाटप करून जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या सोयीनुसार एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी याप्रसंगी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ