एअर मार्शल व्ही. ए. पाटकर विशेष गौरव पुरस्कार

 

            अकोला,दि.18(जिमाका)- राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करण्याऱ्या  माजी सैनिक, पत्नी किवा पाल्य तसेच शैक्षणिक वर्ष 2019-2020 मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय शिक्षण मंडळातून इयत्ता १० वी १२ वी  ९० टक्के पेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या माजी सैनिकांच्या पाल्यांना एअर मार्शल व्ही. ए. पाटकर विशेष गौरव पुरस्काराकरीता निवड करण्याकरीता अर्ज मागविण्यात येत असून फार्म भरण्याची शेवटीची तारीख १५ सप्टेंबर ही आहे. तरी अकोला जिल्हयातील  सर्व माजी सैनिक, विधवा पत्नी यांनी नोंद घ्यावी, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कळविले आहे.

            राष्ट्रीय, आतंरराष्ट्रीय पातळीवर विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करण्याऱ्या माजी सैनिक, पत्नी  किवा पाल्य यांना शैक्षणिक वर्ष 2019-2020 मध्ये खेळातील पुरस्कार प्राप्त खेळाडु, साहित्य, संगित, गायन, वादन, नृत्य इत्यादि क्षेत्रातील पुरस्कार विजेते, यशस्वी उद्योजकांचा पुरस्कार मिळविणारे, संगणक क्षेत्रात अतिउत्कृष्ट कामगिरी करणारे तसेच देश किवा राज्याची प्रतिष्ठा वाढवतील अशा स्वरूपाचे लक्षणीय काम करणारे माजी सैंनिक, पत्नी किवा पाल्य यांना विशेष गौरव पुरस्काराकरीता निड करण्याकरीता अर्ज मागविण्यात येत असून फॉर्म भरण्याची शेवटीची तारीख १५ सप्टेंबर ही आहे. तरी जिल्ह्यातील सर्व माजी सैनिकविधवा पत्नी यांनी नोंद घ्यावी,  असे प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी बाबासाहेब गाढवे यांनी कळविले आहे. विषेश गौरव पुरस्काराचे फार्म कार्यालयात उपलब्ध आहे,

            केन्द्रीय शिक्षण बोर्ड, नवी दिल्ली येथुन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या ग्रेड शीट निष्पाद प्रमाणपत्रामध्ये प्राप्त गुण व टक्केवारी दर्शविण्यात येत नाही. तरी सदर प्रकरणासोबत संबधीत विद्यालयाचे गुणपत्रक (Statenent of Marks) टक्केवारीसह जोडण्यात यावे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ