160 अहवाल प्राप्त; 11 पॉझिटीव्ह, 32 डिस्चार्ज

अकोला,दि.25 (जिमाका)-आज दिवसभरात (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 160 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 149 अहवाल निगेटीव्ह तर  11 अहवाल पॉझिटीव्ह आले. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 3555(2946+609) झाली आहे. आज दिवसभरात 32 रुग्ण बरे झाले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 26110 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 25427, फेरतपासणीचे 174 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 509  नमुने होते. आजपर्यंत एकूण 25948 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 23002 आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल 3555(2946+609) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आज 11 पॉझिटिव्ह

आज दिवसभरात 11 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात आज सकाळी नऊ  जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात चार महिला व पाच पुरुष आहेत. त्यातील आदर्श कॉलनी व रायखेड ता. तेल्हारा  येथील प्रत्येकी तीन जणतर उर्वरित रतनलाल प्लॉट, आडगाव ता. तेल्हारा व खडकी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तसेच आज सायंकाळी  दोन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात एक महिला व एक पुरुष आहे. ते दोन जण गौरक्षण रोड, अकोला येथील रहिवासी आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, काल रात्री प्राप्त झालेल्या रॅपिड अँटीजन टेस्ट मध्ये 24 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे.

32 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 10 जणांना, कोविड केअर सेंटर येथून 12 जण, आयकॉन हॉस्पीटल येथून दोन जण, हॉटेल रेजेन्सी येथून दोन जण, हॉटेल रणजित येथून एक जण तर कोविड केअर सेंटर, हेंडज ता. मुर्तिजापूर येथून पाच जण, अशा एकूण 32 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.

357 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 3555(2946+609) आहे. त्यातील  144 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची  3054 संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 357 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम