रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात १६६ चाचण्या, २८ पॉझिटिव्ह


अकोला,दि.२९ (जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या १६६ चाचण्या झाल्या त्यात  २८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.
            आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे-  अकोला ग्रामिण येथे ४२ चाचण्या झाल्या त्यात १५ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. अकोट येथे १६ चाचण्या झाल्या त्यात तिघांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. बाळापूर येथे नऊ चाचण्या झाल्या त्यात कुणाचा अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. बार्शी टाकळी येथे सात जणांच्या चाचण्या झाल्या त्यात दोन जण पॉझिटीव्ह आले. पातूर, तेल्हारा व मुर्तिजापूर येथे चाचण्या झाले नाही. तर अकोला मनपा येथे ५८ जणांच्या चाचण्या झाल्या त्यात सहा जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. अकोला आयएमए येथे दोन चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. तर ३२ वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. असे दिवसभरात १६६ चाचण्यांमध्ये २८ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आले.तर आजपर्यंत १२४३७ चाचण्या झाल्या त्यात ७२१ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा