महिला मोटार कॅब (ऑटोरिक्षा) परवानासाठी अर्ज आमंत्रित

    अकोला,दि.11 (जिमाका)- महिला परवानाधारकाच्या मालकीची मोटार कॅब(ऑटोरिक्षा) वाहनास महिला सुरक्षेततेच्या दृष्टीने पुढील अटी व शर्तीच्या अधिन राहून प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने वाहन नोंदणी करण्यास मंजूरी प्रदान करण्यात आली आहे.

            अकोला जिल्ह्यामध्ये नविन महिला मोटार कॅब (ऑटोरिक्षा) परवाना करीता अर्ज स्विकारणे सुरु करण्यात आलेले असून इच्छुक महिला विहित नमुन्यात अर्ज सादर करावे, असे आवाहन उपप्रादेशिक परीवहन अधिकारी विनोद जिचकार यांनी केले आहे.

अर्जदारांने विहित नमुन्यातील अर्ज पी.को.पी.ए. सादर करावा लागेल तसेच अर्जदार हा भारतीय नागरिक असावा, महिला पनवानाधारकांच्या मालकीची प्रत्येक  मोटार कॅब (ऑटोरिक्षा) अबोली रंगाने रंगविलेली असावी, महिला पनवानाधारकाच्या मालकीची प्रत्येक मोटार कॅब (ऑटोरिक्षा) सदैव महिला चालकानेच चालविली पाहिजे, अर्जदारास पोलीस विभागाकडून अलीकडचा चारित्र्य पडताळणी अहवाल सादर करावा लागेल, अर्जदारास ती सरकारी, निमसरकारी, खाजगी संस्था, कंपनी अथवा संघठीत क्षेत्रातील कोणत्याही संस्थेत व उद्योगात नोकरी करीत नसल्याचे तसेच स्वत:चे नाव ऑटारिक्षा किवा टॅक्सी परवाना नसल्याचे व मिटर प्रमाणेच  प्रवासी भाडे आकारेल आणि दिलेल्या परवाना क्षेत्राबाहेर प्रवाशी वाहतुक करणार नाही अशा आशयाचे प्रतिज्ञापत्र सादर करावे लागेल, अर्जदाराकडे वैध ऑटोरिक्षा अनुज्ञप्ती व सार्वजनिक सेवा वाहनाचा ऑटोरिक्षा बॅज असणे आवश्यक आहे. तसेच अर्जदार स्थानिक रहिवासी असल्याचे एस.ई.सी. प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे, परवाना शुल्क  पाचशे रुपये अधिक अतिरिक्त परवाना शुल्क  10  हजार रुपये असे एकूण 10 हजार 500 रुपये रोख स्वरुपात शुल्क भरणा करावा लागेल, अर्जदारास मोटार वाहन कायदा अंतर्गत नेमून दिलेल्या अटी व शर्तीचे पालन करावे लागेल तसेच अर्जदाराने आपला अर्ज www.parivahan.gov.in या संकेतस्थळावर अर्ज भरावे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ