रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 141 चाचण्या, सात पॉझिटिव्ह

 


अकोला,दि.२३ (जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 141 चाचण्या झाल्या त्यात सात जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.

            आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे- अकोला ग्रामीण, अकोट, बार्शीटाकळी, पातूर, मुर्तिजापूर व तेल्हारा येथे चाचण्या झाला नाही. बाळापूर येथे तीन चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, तसेच अकोला मनपा येथे 107 चाचण्या झाल्या त्यात सहा जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आला, वैद्यकीय कर्मचाऱ्यांपैकी  30 जणांच्या चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात येथे एकाची चाचण्या झाली त्यात कोणचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, अशा प्रकारे दिवसभरात 141 जणांच्या चाचण्या झाल्या त्यात सात जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. आतापर्यंत जिल्ह्यात 11402 चाचण्या झाल्या असून 590  जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ