रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 15 चाचण्या, कोणीही पॉझिटिव्ह नाही
अकोला,दि. 2(जिमाका)- कोरोना
संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज
दिवसभरात झालेल्या 15 चाचण्यामध्ये कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, अशी माहिती निवासी
उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.
आज दिवसभरात झालेल्या चाचण्या
याप्रमाणे- अकोला ग्रामिण, अकोट, पातूर, बाळापूर, तेल्हारा व मुर्तिजापूर येथे
चाचण्या झाल्या नाहीत. बार्शीटाकळी येथे तीन चाचण्या झाल्या त्यात
कोणचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. तसेच अकोला मनपामध्ये चाचण्या झाल्या नाही, अकोला जिल्ह्यातील आरोग्य
कर्मचाऱ्यांच्या 12 जणांच्या चाचण्या घेण्यात आल्या त्यात कोणाचाही अहवाल
पॉझिटीव्ह आला नाही. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आज चाचण्या झाल्या
नाहीत, असे एकूण 15 चाचण्या होऊन त्यात कोणाचाही
अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. आतापर्यंत
जिल्ह्यात 7805 चाचण्या झाल्या असून 372 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा