246 अहवाल प्राप्त; 45 पॉझिटीव्ह, 43 डिस्चार्ज


 

अकोला,दि. 5 (जिमाका)-आज दिवसभरात (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 246 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 201 अहवाल निगेटीव्ह तर  45 अहवाल पॉझिटीव्ह आले. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 2800(2384+416) झाली आहे. आज दिवसभरात 43 रुग्ण बरे झाले. आता 401 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 20634 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 20049, फेरतपासणीचे 167 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे  418  नमुने होते. आजपर्यंत एकूण 20571 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 18187   आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल 2800(2384+416)आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आज 45 पॉझिटिव्ह

आज दिवसभरात 45 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आज सकाळी 36 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात 20 महिला व 16 पुरुष आहेत. त्यातील दाळंबी येथील नऊ जण, विठ्ठल नगर मोठी उमरी येथील पाच जण, बोरगाव मंजू व वाडेगाव येथील प्रत्येकी तीन, अकोट, डाबकी रोड व आगर येथील प्रत्येकी दोन तर उर्वरित मुर्तिजापूर, संताजी नगर, बार्शीटाकळी, रिधोरा, दहिहांडा, शिवर, संकल्प कॉलनी, कोठारी, केशव नगर व अग्रसेन भवन येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तसेच आज सायंकाळी नऊ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात एक महिला व आठ पुरुष आहेत. त्यातील मलकापूर येथील चार जण, आगर येथील तीन जण तर बाबुळगाव येथील दोन जण याप्रमाणे रहिवासी आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

 

43 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 24 जणांना, कोविड केअर सेंटर अकोला येथून 13 जणांना, तर हॉटेल रेजेन्सी येथून सहा जणांना अशा एकूण 43 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.

401 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 2800(2384+416) आहे. त्यातील  जण 113 मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची  2286 संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 401 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन