270 अहवाल प्राप्त; 24 पॉझिटीव्ह, 18 डिस्चार्ज, 4 मयत




अकोला,दि.1 (जिमाका)-आज दिवसभरात (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 270 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 246 अहवाल निगेटीव्ह तर  24 अहवाल पॉझिटीव्ह आले. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 2661(2300+361) झाली आहे. आज दिवसभरात 18 रुग्ण बरे झाले. आता 438 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 20098 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 19529, फेरतपासणीचे 167 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे  402  नमुने होते. आजपर्यंत एकूण 19978 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या  17678   आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल 2661(2300+361) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
आज 24 पॉझिटिव्ह
आज दिवसभरात 24 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आज सकाळी १८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात  आठ महिला व १० पुरुष आहेत. त्यातील हिवरखेड तेल्हारा येथील आठ जण, अकोट, खांबोरा बार्शिटाकली व जठारपेठ  येथील प्रत्येकी दोन तर उर्वरित बाबुळगाव जहागीर, बाळापूर, दहीहंडा, शिवाजी नगर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.  तसेच आज सायंकाळी सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात दोन महिला व चार पुरुष आहेत. त्यात राम नगर व मलकापूर येथील प्रत्येकी दोन जण तर धाबा बार्शीटाकळी व काला सोसायटी, अकोला येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

18 जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून सात जणांना, कोविड केअर सेंटर अकोला येथून 10 जणांना तर आयकॉन हॉस्पीटल येथून एक जण अशा एकूण 18 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.
चार मयत
दरम्यान चार जणांचा मृत्यू झाले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालातील दोन जणांचा मृत्यू झाला.  त्यात ५८ वर्षीय पुरुष असून ते जेतवण नगर, खदान, अकोला येथील रहिवासी आहे. त्यांना दि. २६ जुलै रोजी दाखल झाल्या होत्या. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला, 69 वर्षीय पुरुष असून ते हिवरखेड, तेल्हारा येथील रहिवासी आहे. त्यांना दि. 23 जुलै रोजी दाखल झाले होते. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला.
तसेच ओझोन हॉस्पीटल येथे दोन जणांचे मृत्यू झाले. त्यात 77 वर्षीय महिला असून त्या नानक नगर निमवाडी येथील रहिवासी आहे. तर 72 वर्षीय पुरुष असून ते अंबिका लेआऊट ता. अकोट येथील रहिवासी आहे.  त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला.

438 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु
आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 2661(2300+361) आहे. त्यातील  जण 109 मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची  2114 संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 438 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना